मिशन रेबीजः मुंबई मोहीम
आढावाः
महाराष्ट्राची गजबजलेली राजधानी, मुंबई, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक गतिशील महानगर आहे. 'स्वप्नांचे शहर' म्हणून ओळखले जाणारे हे शहर विविध संस्कृतींचे मिश्रण, आर्थिक शक्तीस्थान आणि बॉलीवूडच्या प्रतिष्ठित चित्रपट उद्योगाचे घर आहे.
मुंबईत दरवर्षी सुमारे ६०, ००० कुत्रे चावल्याची नोंद होते.
रेबीजमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ९९% मृत्यू संक्रमित कुत्र्याच्या चावल्यामुळे होतात.
२०२२ मध्ये, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने रेबीजला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले होते, ज्यामुळे राज्यभरातील रेबीज नियंत्रण उपक्रमांना मोठी चालना मिळाली.
२०२३ मध्ये, मुंबई मोहिमेचा विस्तार अंधेरी पश्चिम आणि चेंबूर पूर्व या प्रमुख क्षेत्रांमध्ये झाला. शिवाय, पनवेल, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या भागांचा समावेश केला जाईल.

आमचा दृष्टीकोनः
रेबीजमुळे होणारे मानवी मृत्यू रोखण्यासाठी रेबीज लसीकरण ही सर्वात किफायतशीर पद्धत आहे.
रेबीजवरील शिक्षण, चाव्याच्या जखमेवर उपचार आणि चावा रोखण्याचे शिक्षण, समुदायांना या प्राणघातक विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक साधने देते.
मिशन रेबीज आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये २०२२ मध्ये एक सामंजस्य करार झाला. त्यानुसार मिशन रेबीज कडून मोफत लसीकरण, रेबीज संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शन आणि रेबीजचे रुग्ण शोधण्यासाठी मदत केली जाणार आहे. मुंबई शहर रेबीज विरहित बनविण्याची योजना आहे.
आता आम्ही मुंबई आणि आसपासच्या भागातील ७०% पेक्षा जास्त कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी स्थानिक भागधारकांसोबत काम करत आहोत. ७०% कुत्र्यांचे लसीकरण Herd immunity (कळप प्रतिकारशक्ती) तयार करण्यासाठी आवश्यक आहे.
सहकारी:

















आमची टीम:
डॉ. कलिम्पशा अहमदखान पठाण,
जी. एम., देवनार कत्तलखाना, बृहन्मुंबई महानगरपालिका पशु चिकित्सा स्वास्थ्य विभाग
बृहन्मुंबई नगर निगम
डॉ. स्नेहा तातेलु
वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका पशु चिकित्सा स्वास्थ्य विभाग
बृहन्मुंबई नगर निगम
डॉ. अश्विन अलीस
मुंबई प्रकल्प पथकाचे प्रमुख
मिशन रेबीज



